loader
Breaking News
Breaking News
Foto

लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीस २० वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा

खेड (प्रतिनिधी) - दि. ०६/०५/२०२६ रोजी खेड पोलीस स्टेशन गु.र.न. ५३८/२०२१, स्पेशन केस नं. २/२०२२ या गुन्हयामध्ये लहान बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी रोहन शंकर पालकर, वय- २३ वर्षे, रा. खारी-सुसेरी, ता. खेड, जि. रत्नागिरी यांस खेड येथील न्यायालयाने (जिल्हा न्यायाधीश १ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश साो. श्री. पी.एस. चांदगुडे) यांनी भा.द.वि.कलम ३७६ (२) (j) (n), ३७६ (f), ३७६(३) (A) ५०६(A), POCSO ४, ५, ६, ८, १०, १२ खाली अन्वये दोषी धरुन शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दिनांक ०६/०५/२०२६ यांस सदर गुन्हाचे कामी निकाल होवून आरोपी यांस भा.द.वि. कलम ३७६ (२) (j) (n) अन्वये २० वर्षे सश्रम कारावास व ५०००/- दंड, दंड न भरल्यास १५ दिवस सश्रम कारावास, भा.द.वि.कलम ३७६ (३) अन्वये २० वर्षे सश्रम कारावास व ५०००/- दंड, दंड न भरल्यास १५ दिवस सश्रम कारावास, भा.द.वि. कलम ३७६ (f) अन्वये २० वर्षे सश्रम कारावास व ५०००/- दंड, दंड न भरल्यास १५ दिवस सश्रम कारावास, भा.द.वि. कलम ५०६ (A) अन्वये ६ महिने सश्रम कारावास, पोक्सो कलम ४ व ६ अन्वये २० वर्षे सश्रम कारावास व ५०००/- दंड, दंड न भरल्यास १५ दिवस सश्रम कारावास, पोक्सो कलम ८ अन्वये ३ वर्षे सश्रम कारावास व २०००/- दंड, दंड न भरल्यास १५ दिवस सश्रम कारावास, पोक्सो कलम १० अन्वये ५ वर्षे सश्रम कारावास व २०००/- दंड, दंड न भरल्यास १५ दिवस सश्रम कारावास, पोक्सो कलम १२ अन्वये १ वर्षे सश्रम कारावास व २०००/- दंड, दंड न भरल्यास १५ दिवस सश्रम कारावास अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे. थोडक्यात हकिकत अशी की, पीडीत बालिका ही शालेय विद्यार्थिनी असून कोविड काळामध्ये ऑनलाईन क्लासेससाठी आपल्या मैत्रिणीच्या घरी गेली असता आरोपी याने घरात कोणी नसल्याचा फायदा घेवून, पिडीतेस धमकावून तिच्यावर जबरदस्तीने लैगिंक अत्याचार केले. तसेच सदर बाब कोणाला सांगितल्यास पिडीतेस, व तिच्या आई-वडिलांस जीवे मारण्याची धमकी दिली. सदर धमकीस घाबरुन पीडीता झालेल्या अत्याचाराबद्दल कोणाशीही बोलली नाही. परंतु सदर प्रकरणी पिडीतेचा मासिक धर्म यास दिरंगाई झाल्याने तिच्या आईने पिडीतेला डॉक्टरकडे घेवून गेली असता तपासणीअंती सर्व प्रकार उघड झाला. सबब आरोपीवर खेड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करणेत आला होता.

टाईम्स स्पेशल

सदर प्रकरणी सरकार पक्षातर्फे एकुण ११ साक्षीदार तपासणेत आले. सदरकामी पिडीतेची स्वतःची साक्ष, तसेच डी.एन.ए अहवाल महत्त्वाचे ठरले. तसेच वैद्यकीय पुरावा डी.एन.ए अहवाल याकामी निर्णयात्मक ठरले. सर्व गोष्टीचा मे. कोर्टाने साकल्याने विचार करुन आरोपी विरुध्द गुन्हा सिध्द झाला असल्याचे जाहीर केले. सदर प्रकरणी सरकारी वकील अॅड.सौ. मृणाल जाडकर यांनी सरकार पक्षाच्या बाजुने, युक्तीवाद करुन संपुर्ण केसचे कामकाज पाहिले. तपासिक अंमलदार श्रीमती सोनाली झेंडे महिला पोलीस उपनिरीक्षक, पोलीस ठाणे खेड तसेच कोर्ट पैरवी श्री. चंद्रमुनी ठोके पोकॉ/१००० यांचे अनमोल सहकार्य लाभले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg