loader
Breaking News
Breaking News
Foto

साटेली भेडशी बाजारपेठेत कर्णकर्कश दुचाक्यांचा धुमाकूळ; नागरिक त्रस्त

तिलारी (प्रतिनिधी) - साटेली भेडशी बाजारपेठ व परिसरात दुचाक्यांचे सायलेंसर बदलून मोठा आवाज करत वाहन चालविणाऱ्या युवकांमुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. विशेषतः रात्री उशिरा व अपरात्री काही युवकांकडून ‘धूम स्टाईल’ने वेगाने दुचाक्या चालविल्या जात असून, त्यामुळे परिसरात ध्वनीप्रदूषण वाढत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दुचाक्यांच्या कर्णकर्कश आवाजामुळे रुग्ण, वयोवृद्ध नागरिक तसेच लहान मुलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रात्रीच्या शांततेत अचानक होणाऱ्या या मोठ्या आवाजामुळे नागरिकांची झोपमोड होत असून भीतीचे वातावरणही निर्माण होत असल्याची प्रतिक्रिया स्थानिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

टाइम्स स्पेशल

बदल केलेले सायलेंसर वापरून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. तसेच बाजारपेठ व गर्दीच्या ठिकाणी पोलिसांनी नियमित गस्त वाढवून अशा प्रकारांना आळा घालावा, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg