loader
Breaking News
Breaking News
Foto

कारची रिक्षाला धडक, २ जखमी

खेड : रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या रिक्षाला पाठीमागून आलेल्या स्वीफ्ट कारने धडक दिल्याने रिक्षाचालक आणि रिक्षातील प्रवासी जखमी झाल्याची घटना रविवार १० मे रोजी सायंकाळी ७वाजता मुंबई - गोवा महामार्गावर सतीचा कोंड (ता. खेड) येथे घडली. पेट्रोल भरायला जाण्यासाठी म्हणून रिक्षाचालक अनंत महादेव दळवी खवटी येथे रस्त्याच्या कडेला थांबला होता. त्यावेळी मागून आलेल्या स्वीफ्ट कारने रिक्षाला धडक दिली. या अपघातात अनंत दळवी (५६, खवटी, ता. खेड) आणि हिराचंद लक्ष्मण धोतरे (४०, रा. खवटी, ता. खेड) हे दोघेजण जखमी झाले आहेत. हिराचंद धोतरे यांची प्रकृती गंभीर आहे. या दोघांवर कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी कारचालक नवप्रीतसिंग वासन (वय २६ रा. ठाणे) याच्यावर गुन्हा दाखल केला असून, खेड पोलिस अधिक तपास करत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg