loader
Breaking News
Breaking News
Foto

महामार्गावरील रखरखत्या उन्हात पोलिसांची कसोटी

संगलट खेड (इक्बाल जमादार) - संपूर्ण राज्यामध्ये सध्या वाढत्या तापमानाचा म्हणजेच उन्हाच्या झळांचा सर्वांनाच सामना करावा लागत असतानाच आज राज्यातील महत्त्वाचा समजला जाणाऱ्या मुंबई गोवा महामार्गावर भर उन्हात पोलिस प्रशासनाच्या वाहतूक पोलिसांची अक्षरशः कसोटी पाहायला मिळाली. ही वाहतूक कोंडी सुरळीतपणे पार पाडत असताना त्यांनी वाढते तापमान आणि उन्हाची तमा न बाळगता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेली जबाबदारी पार पाडत वाहतूक सुरळीत ठेवण्याचे यशस्वी प्रयत्न केले आहेत. विशेष करून शनिवार आणि रविवार हे सुट्टीचे दिवस असून देखील वाहतूक कोंडी न झाल्यामुळे भर उन्हात त्यांच्या कामगिरीची कसोटी सुरु असतानाच ते आपल्या कामात यशस्वी झाले असल्याचे पाहायला मिळत होते. त्यांच्या या कामाशी एकनिष्ठ आणि तत्पर असणाऱ्या कर्तव्यामुळे वाहन चालक तसेच बाहेरून कोकणात येणारे पर्यटक यांचा प्रवास सुखाचा झाल्याने अनेक प्रवासी तसेच वाहन चालक समाधान व्यक्त करत होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

वाहतूक पोलिसांना चोवीस तास अहोरात्र आपले कर्तव्य बजवावे लागते. रायगड पोलिस विभागाचे वाहतूक शाखेचे हे वाहतूक पोलिस रायगड जिल्ह्याच्या जिल्हा पोलिस अधीक्षक आचल दलाल यांच्या आदेशानुसार आणि जिल्हा वाहतूक पोलिस निरीक्षक सरिता चव्हाण यांच्यामार्गदर्शनाखाली आपले चोख काम बजावत असल्याची अनेक उदाहरणे पाहायला मिळाली आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे भर दुपारी बारा ते एकच्या सुमारास तापमान ३५ ते ४० च्या आसपास असताना आणि शनिवार, रविवार हे सुट्टीचे दिवसअसताना नेहमी होणारी वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी झटत असताना दिसत होते. त्यांच्या या भर उन्हातील यशस्वी कामगिरीमुळे आज मुंबई गोवा महामार्गावर रामवाडी ब्रीजपासून ते वाशी नाका या दरम्यान असणारी वाहतूककोंडी आज पहायला मिळाली नाही.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg