loader
Breaking News
Breaking News
Foto

गिम्हवणे येथील हाॅटेल कोहिनूर समोर वाहतूक कोंडी

दापोली (प्रतिनिधी) - दापोली हर्णे मार्गावर गिम्हवणे हद्दीत हाॅटेल कोहिनूर समोर सोमवारी वाहतूक कोंडी झाल्याने वाहनांना एकाच ठिकाणी कित्येक वेळ वाहतूक कोंडी सुटेपर्यंत थांबून राहावे लागले. दापोलीला मिनी महाबळेश्वर म्हटले जाते. असे हे दापोली आता थंड हवेचे ठिकाण बदलू लागले आहे मात्र येथे असलेल्या केळशी ते दाभोळ दरम्यानच्या एकुणच समुद्र किनाऱ्यांची ओढ पर्यटकांसह स्थानिकांनाही स्वस्थ बसू देत नाही. त्यामुळे दापोली हर्णे मार्ग हा तसा कायमच वाहनांच्या वर्दळीने गजबजलेला असतो तसे आता मे महिन्यातील आंब्यांचा हंगाम असल्याने मोठ्या संख्येने चाकरमानी आपल्या गावी आले आहेत. तसेच पर्यटकांचीही मांदियाळी आहेच आहे. त्यामुळे दापोली हर्णे मार्ग हा वाहनांच्या वर्दळीने पार गजबजुन जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तशाच प्रकारे सोमवारी या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहने धावू लागली होती. त्यामुळे एखादयाने चुकिच्या दिशेने वाहन चालविले किंवा एखादे अवजड वाहन अडकून पडल्याने वाहतूक समस्येचा सामना करावा लागतो आज तसे काही नव्हते मात्र एकुणच या मार्गावर धावणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे वाहतूक कोंडी सुटेपर्यंत एकाच ठिकाणी कित्येक वेळ थांबून राहण्याची वेळ ऐन दुपारी या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांवर आली. दरम्यान हाॅटेल कोहिनूर समोरच झालेली वाहतूक कोंडीची रांग पार पटवर्धन हाॅस्पिटलपर्यंत पोहोचली. तर इकडे बुरोंडी पोलिस चेक नाक्यापर्यत आली. त्यामुळे लांबच लांब वाहनांच्या रांगा लागलेल्या पाहावयास मिळाल्या.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg