loader
Breaking News
Breaking News
Foto

कोळंब येथे १५ रोजी महसूलचे समाधान शिबीर

मालवण (प्रतिनिधी) - महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांच्याकडील शासन निर्णयानुसार, तहसील कार्यालय, मालवणमार्फत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान (टप्पा-१) अंतर्गत कोळंब महसूली मंडळ स्तरावर शुक्रवारी दि. १५ मे रोजी सकाळी १० वा. कोळंब येथील समर्थ मंगल सभागृह येथे महसूल शिबिराचे आयोजन केले असल्याची माहिती तहसीलदार गणेश लव्हे यांनी दिली. कोळंब मंडळ स्तरावरील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी व महिलांसाठी महसूल विभागातील महत्वाच्या १५ सेवांचा लाभ एकाच दिवशी देण्यासाठी हे विशेष अभियान राबविण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

प्रलंबित फेरफार, ७/१२ मधील चुकीची दुरुस्ती, डिजिटल स्वाक्षरीचे ७/१२ व ८-अ उताऱ्यांचे वाटप, उत्पन्न, रहिवासी व जात प्रमाणपत्र, नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र, अकृषिक (एनए) परवानगी, अकृषिक तरतुदीबाबत मार्गदर्शन व सुधारणा, 'सनद' प्रक्रियेची माहिती, सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे (संजय गांधी योजना योजना) लाभ मंजूर करणे, विद्यार्थ्यांसाठी दाखले वाटप, तुकडेबंदी कायदा उल्लंघन प्रकरणांचा निपटारा, घरांसाठी पट्टेवाटप व ई-मोजणी अर्ज, ऍग्रीस्टॅक शेतकरी नोंदणी, पीएम किसान नोंदणी, वर्ग २ चे वर्ग १ करण्याबाबतची प्रकरणे, आयुष्यमान भारत कार्ड, रेशनकार्डवरील नाव कमी-जास्त करणे तसेच भूसंपादन व अकृषिक परवानगी प्रकरणी 'कमी-जास्त पत्रके' तयार करून गाव दप्तर अद्ययावतची कामे करण्यात येणार आहेत. संबंधित नागरिक तसेच विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार लव्हे यांनी केले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg