loader
Breaking News
Breaking News
Foto

संगमेश्वर-आरवली येथे अवकाळी पावसाचा धुमाकूळ; महामार्गावरील वाहनचालकांची धावपळ

संगमेश्वर (सत्यवान विचारे) - संगमेश्वर तालुक्यातील आरवली परिसरात आज संध्याकाळी अचानक अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्या दुचाकी वाहनचालकांची चांगलीच धांदल उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. पावसाचा जोर वाढल्याने अनेक दुचाकीस्वारांनी सुरक्षिततेसाठी महामार्गालगत असलेल्या पेट्रोल पंपांवर आणि इतर आडोशाच्या ठिकाणी आश्रय घेतला. अचानक बदललेल्या वातावरणामुळे काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाल्याचे दिसून आले. या अवकाळी पावसामुळे परिसरातील नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून, हवामानातील बदलामुळे शेतकरी वर्गही चिंतेत असल्याचे बोलले जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg