loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड तालुक्यातील खारीपट्ट्यातील अमशेत गावच्या तैसीर परकार यांना वैद्यकीय पदवी

संगलट (खेड) (इक्बाल जमादार) - खेड तालुक्यातील अमशेत गावचे सुपुत्र तथा दुबईस्थित व्यावसायिक इब्राहिम परकार आणि सांगलट येथील माहेरवाशीण वसीमा इशाक नाडकर यांचे सुपुत्र डॉ. तैसीर वसीमा इब्राहिम परकार यांनी वैद्यकीय शिक्षणात उल्लेखनीय यश संपादन करत एमबीबीएस पदवी प्राप्त केली आहे. त्यांच्या या यशाबद्दल खेड तालुक्यासह अमशेत आणि सांगलट परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

डॉ. तैसीर परकार यांनी २०२४ साली चीनमधील झेंगझोऊ विद्यापीठातून एमबीबीएस पदवी यशस्वीरित्या पूर्ण केली. त्यानंतर भारतात परतल्यानंतर त्यांनी एफएमजीई परीक्षा २०२५ प्रथम श्रेणीने उत्तीर्ण करत इंडियन मेडिकल कौन्सिलचा परवाना मिळवला.

टाइम्स स्पेशल

लहानपणापासून शिक्षणाची आवड आणि डॉक्टर होण्याचे ध्येय मनाशी बाळगून त्यांनी कठोर परिश्रमाच्या जोरावर हे यश संपादन केले. आपल्या यशामागे आई-वडील यांच्यासह चुलते बशीर परकार आणि चुलती शकीला बशीर परकार यांचे मोठे योगदान असल्याची भावना डॉ. तैसीर यांनी व्यक्त केली.डॉ. तैसीर यांच्या यशामुळे अमशेत, संगलट तसेच संपूर्ण खरीपट्टा परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg