loader
Breaking News
Breaking News
Foto

तेरेवायंगणीत आपुलकीच्या मायेच्या ओलाव्याचा आनंद मिळतो, शिवसेना तालुकाप्रमुख ऋषिकेश गुजर

दापोली (प्रतिनिधी) - दापोली तालुक्यातील तेरेवायंगणी येथील अमर उत्कर्ष मंडळ, नवरत्न महिला मंडळ, संलग्न अमर स्पोर्ट्स क्लब तेरेवायंगणी मधलीवाडी येथील वार्षिक श्री सत्यनारायण महापूजेच्या निमित्ताने शिवसेना तालुकाप्रमुख ऋषिकेश गुजर यांनी कार्यक्रमाला सदिच्छा भेट देऊन श्री सत्यनारायण महापूजेचे दर्शन घेतले. यावेळी तेरेवायंगणी मधलीवाडीच्या वतीने शिवसेना तालुकाप्रमुख ऋषिकेश गुजर यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना तालुका सचिव नरेंद्र करमरकर, मधलीवाडी मुंबई मंडळाचे अध्यक्ष सुरेश खांबे, माजी सरपंच वसंत शिगवण, तंटामुक्त अध्यक्ष पांडुरंग शिगवण, दिलीप तेरेकर, संतोष भुवड, माजी उपसरपंच डी.एल. कोळंबे, संतोष खांबे, ए.के. शिगवण आदींसह प्रतिष्ठित नागरिक, ग्रामस्थ आणि पदाधिकारी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ऋषिकेश गुजर म्हणाले ग्रामीण आणि मुंबईत राहणाऱ्या सगळ्याच लोकांचे यानिमित्त दर्शन झाले. तुम्ही जेव्हा जेव्हा आम्हाला हाक माराल तेव्हा तेव्हा शिवसेना म्हणून तुमच्या हाकेला हो देण्यासाठी आम्ही तयार आहोत, मदतीसाठी तयार आहोत. खरंतर तेरेवांयगणी गावाचं नाव असलं तरी मेरेवांगणी असेच म्हणावे लागेल. कारण या गावात खऱ्याअर्थाने आम्हाला आपुलकीच्या ओलाव्याचा आनंद मिळतो, यापेक्षा अधिक काय हवं आणि म्हणून तेरेवायंगणी गावावर असलेले शिवसेनेचे प्रेम कधीही कमी होणार नाही, अशा प्रकारचा विश्वास ऋषिकेश गुजर यांनी दिला.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg