loader
Breaking News
Breaking News
Foto

माध्यमिक विदयालय सुकदर ता. खेड चा इ. 10 वी चा निकाल 100 टक्के

खेड - नातेपुते एज्युकेशन सोसायटी, नातेपुते संचलित मौजे सुकदर कुणबी ग्रामस्थ मंडळाच्या माध्यमिक विदयालय सुकदर ता. खेड या शाळेचा एस.एस.सी. परीक्षेचा निकाल सतत पंधरा वर्षे 100 टक्के लागला आहे प्रशालेत किर्ती संजय टेमकर 488 गुण 97.20 टक्के मिळवून प्रथम, तन्मय संतोष वानखेडे 476 गुण 95.20 टक्के मिळवून व्दितीय आणि सिध्दी शेखर कोळंबे 473 गुण 94.60 मिळवून तृतीय, आर्या राजेश कोळंबे 458 गुण 91.60 टक्के मिळवून चौथी आणि तन्वी दिनेश कोळंबे 456 गुण 91. 20 टक्के मिळवून पाचवी आलेली आहेत. एकुण 32 विदयार्थी प्रविष्ठ झाले त्यापैकी विशेष श्रेणी प्राप्त 09, प्रथम श्रेणी 11, व्दितीय श्रेणी 11, पास श्रेणी 01 विदयार्थ्यांनी यश संपादन केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

नातेपुते एज्युकेशन सोसायटी, नातेपुते संचलित मौजे सुकदर कुणबी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष व सचिव अशोक गणपत कोळंबे उपाध्यक्ष गणपत आंबवले व सर्व सदस्य शालेय शिक्षण समिती अध्यक्ष सुरवत परकार व सर्व सदस्य अनंत नारायण कोळंबे, आश्विनी अजित घाडगे, अविनाश भुवड, अनुजा अनिल काटकर सुकदर, शेरवली व टेटवली गावचे सरपंच व शाळेचे मुख्याध्यापक राजकुमार बांगर, वानखेडे, कुळे, गावीत, भोसले आणि लिपीक राजेश कोळंबे व प्रदिप कोळंबे, तसेच सुकदर शेरवली व टेटवली येथील सर्व ग्रामस्थ देणगीदार व हितचिंतक यांनी यशस्वी विदयार्थ्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg