loader
Breaking News
Breaking News
Foto

देवळे येथील श्री कालेश्वरी देवीच्या मूर्तींची जल्लोषात मिरवणूक

देवळे (प्रकाश चाळके) - संगमेश्वर तालुक्यातील देवळे येथे श्री देवी कालेश्वरी मूर्तीची देवळे वाणीवाडी ते देवळे बाजारपेठ कालेश्वरी मंदिर येथे दिनांक 6. मे रोजी सायंकाळी 4.30 ते 6.30 वाजेपर्यंत भव्य दिव्य अशी सुमारे दोन तास मिरवणूक काढण्यात आली. श्री देवी कालेश्वरी ची मूर्ती उडपी येथून आणून वाणीवाडी येथे ठेवण्यात आली होती. वाणी वाडी ते कालेश्वरी मंदिर अशी ही मूर्ती मिरवणुकीने नेण्यात आली. ही मिरवणूक तब्बल दोन तास ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतषबाजीत गुलालांची उधळण करीत भगवी निशाने हातात घेऊन भगवे आणि पांढरे पोषख घालून अबालरुद्ध, महिला ,पुरुष यांनी या मिरवणुकीमध्ये सहभाग नोंदवला. सुमारे चार हजाराच्या आसपास भाविक जमले होते. देवळे गावाला जत्रेचे स्वरूप आले होते. आज होम हवन, महाप्रसाद तसेच हा कार्यक्रम पुढे 8 तारखेपर्यंत चालू राहणार आहे. 8 तारखेला देवीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg