खेड (प्रतिनिधी) - मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे जाधववाडी ते खोपी फाटा परिसरात वाढलेल्या बेकायदेशीर पार्किंगमुळे अपघातांचा धोका वाढला असून, या गंभीर समस्येकडे संबंधित प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी मदत ग्रुप खेडचे संस्थापक अध्यक्ष प्रसाद दिलीप गांधी यांनी निवेदनाद्वारे केली आहे. हे निवेदन पोलिस, महसूल, महामार्ग व सार्वजनिक बांधकाम विभागासह विविध शासकीय यंत्रणांना देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, संबंधित परिसरात मोठ्या प्रमाणात वाहने महामार्गाच्या कडेला बेकायदेशीररित्या उभी केली जात आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळी कोणतीही सुरक्षा व्यवस्था, इंडिकेटर किंवा रिफ्लेक्टर न लावता वाहने पार्क केली जात असल्याने वाहतुकीस गंभीर अडथळा निर्माण होत आहे.
त्यामुळे वाहन चालकांना मोठा धोका निर्माण झाला असून आतापर्यंत अंदाजे १० ते १५ अपघात घडल्याचा दावा करण्यात आला आहे. काही घटनांमध्ये गंभीर जखमी तसेच जीवितहानीही झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. खोपी फाटा ते भरणे जाधववाडी परिसरात अधिकृत हायवे बस थांबा नसल्याने प्रवाशांना रस्त्याच्या कडेला उभे राहून बसची प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह महिला, ज्येष्ठ नागरिक व प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या ठिकाणी तातडीने सुरक्षित हायवे बस थांबा उभारण्यात यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.
निवेदनात प्रशासनाकडे काही महत्त्वाच्या उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. त्यामध्ये बेकायदेशीर पार्किंग करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई, 'नो पार्किंग' फलक उभारणे, रात्री वाहतूक पोलीस गस्त वाढविणे, क्रेनच्या सहाय्याने वाहने हटविण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करणे, अपघातप्रवण ठिकाणी रिफ्लेक्टर व ब्लिंकर बसविणे तसेच विशेष तपासणी मोहीम राबविण्याची मागणी करण्यात आली आहे. नागरिकांच्या जीवित सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने या गंभीर बाबीची तातडीने दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी प्रसाद गांधी यांनी केली आहे.
























































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.