loader
Breaking News
Breaking News
Foto

देविदास इंगळे यांची ग्रामपंचायत विस्तार अधिकारी पदावर पदोन्नती

रत्नागिरी (वार्ताहर) - महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन डीएनई 136 चे रत्नागिरी तालुकाध्यक्ष देविदास इंगळे यांना विस्तार अधिकारी, ग्रामपंचायत या पदावर पदोन्नती झाल्याचे आदेश रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदही रानडे यांनी नुकतेच पारित केले आहेत. देविदास इंगळे यांची गुहागर पंचायत समिती येथे विस्तार अधिकारी ग्रामपंचायत या पदी पदोन्नती झाली आहे. देविदास इंगळे यांनी यापूर्वी राजापूर तालुक्यातील कुवेशी, दळे, जैतापूर, माडबन, जुवेजैतपूर या ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक म्हणून तसेच रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी, गावखडी, पूर्णगड, कासारवेली, काळबादेवी, नेवरे, कोतवडे, धामणसे या ठिकाणी ग्रामविकास अधिकारीपदी काम केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तसेच त्यांनी जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ जिल्हा सरचिटणीस, ग्रामसेवक युनियन जिल्हा सहसचिव, ग्रामसेवक युनियन तालुका अध्यक्ष कास्ट ट्राइब संघटना तालुका अध्यक्ष RMBKS जिल्हाध्यक्ष या पदावर उत्तम कामगिरी केली आहे. त्यांच्या उत्तम कामगिरी बद्दल त्यांना 1999 मध्ये आदर्श ग्रामसेवक पुरस्कार देण्यात आला आहे. इंगळे यांना पदोन्नती मिळाल्या बद्दल त्यांचवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पदोन्नती बद्दल त्यांचा कोतवडे ग्रामपंचायतमध्ये पंचायत समिती सदस्य स्वप्नील उर्फ तारक मयेकर यांच्या हस्ते सरपंच संतोष बारगोडे, माजी सरपंच तुफिल पटेल, माजी उपसरपंच स्वप्नील पड्याळ, ग्रामपंचायत सदस्य पायल पांचाळ, दिया कांबळे, ज्योती मयेकर, ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामस्थ यांच्या उपथितीत सत्कार करण्यात आला. पदोन्नती बद्दल इंगळे यांनी जिल्हा परिषद प्रशासन तसेच तालुका प्रशासन यांचे आभार व्यक्त केले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg