loader
Breaking News
Breaking News
Foto

पतीनेच पेटवले राहते घर, कारण ऐकून बसेल धक्का..

खेड : तालुक्यातील कोतवली येथे एका पतीने स्वतःचेच राहते घर पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पतीचे बाहेर असलेल्या प्रेमसंबंधाची तक्रार पत्नीने पोलीस ठाण्यात केल्याच्या रागातून हे कृत्य करण्यात आले आहे. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम ३२६ (छ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी सचिन सत्यवान जुवळे याचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. यावरून त्याची पत्नी आणि आईने खेड पोलीस ठाण्यातील महिला कक्ष गाठून तक्रार दिली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने महिला समुपदेशन केंद्राच्या वतीने सचिन आणि त्याच्या प्रेयसीला चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. याचा प्रचंड राग मनात धरून सचिनने टोकाचे पाऊल उचलले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मंगळवारी दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास सचिनने कोतवली येथील राहत्या घराच्या पाठीमागील सिमेंटचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. घर नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याने ज्वलनशील पदार्थाचा वापर करून घराला आग लावून दिली. या आगीत घराच्या छपराचे लाकडी भाले जळून खाक झाले असून सर्व कौले खाली कोसळली आहेत. तसेच घरातील संसारोपयोगी वस्तूंचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले असून त्याचा नेमका आकडा अद्याप समजू शकलेला नाही. याप्रकरणी पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून खेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg