loader
Breaking News
Breaking News
Foto

आमदार प्रमोद जठार यांचे लांजा रेस्ट हाऊस येथे भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत

केळंबे-लांजा ( सिराज नेवरेकर) विधान परिषदेचे आमदार झाल्यानंतर आज शनिवारी प्रथमच लांजा दौऱ्यावर आलेल्या प्रमोद जठार यांचे लांजा रेस्ट हाऊस येथे भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत करण्यात आले. माजी आमदार प्रमोद जठार यांच्यावर पक्षाने विश्वास दाखवत त्यांना विधान परिषदेचे आमदार म्हणून जबाबदारी सोपवली आहे. आमदार झाल्यानंतर शनिवारी सकाळी प्रथमच लांजा येथे आलेल्या आमदार प्रमोद जठार यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

भारतीय जनता पार्टीचा विजय असो, जय श्रीराम च्या जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या. त्यानंतर आमदार प्रमोद जठार यांनी उपस्थित भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. पदाधिकाऱ्यांनी पक्ष संघटना वाढीसाठी काम करा. त्यासाठी लागेल ते सहकार्य माझ्याकडून मिळेल. तर पक्षाकडूनही तुमचा योग्य तो सन्मान राखला जाईल, अशा शब्दात त्यांनी मार्गदर्शन केले.

टाइम्स स्पेशल

यानंतर भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून आमदार प्रमोद जठार यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. माजी नगरसेवक संजय यादव व पदाधिकारी यांच्याकडून शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याची प्रतिमा भेट देऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष शैलेश खामकर, विराज हरमले, संजय यादव, गुरुप्रसाद तेली, नगरसेविका प्रणाली तेली, राजन देसाई, माजी तालुकाध्यक्ष चंद्रकांत मांडवकर, जिल्हा पदाधिकारी श्रीकृष्ण हेगिष्टे, संजय गांधी, इकबाल गिरकर, सुमंत वाघधरे, भरत कोळवणकर, मयूर शेडे, प्रभाकर टोळे, दादा खामकर, आदींसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg