loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड प्रभाग क्रमांक 6 मध्ये विविध विकास कामाची भूमिपूजन संपन्न

खेड - महाराष्ट्र राज्याचे माजी पर्यावरण मंत्री, शिवसेना नेते रामदासभाई कदम यांच्या मार्गदर्शनाने, उद्योग मंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदय सामंत तसेच महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम यांच्या सहकार्याने बुधवार दिनांक 6 मे २०२६ रोजी आपल्या प्रभाग क्रमांक 6 मधील विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला आहे. या कार्यक्रमास खेड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष माधवीताई राजेश बुटाला, शहरप्रमुख कुंदन सातपुते, उपनगराध्यक्ष सतीश उर्फ पप्पूशेठ चिकणे, बांधकाम सभापती सुनील दरेकर, शिवसेना गटनेते निकेतन पाटणे, स्वच्छता सभापती तोषिफ खोत, समाजकल्याण सभापती यश खेडेकर, भूषण चिकले, नगरसेविका वैभवी खेडेकर, नगरसेवक स्वप्नील सेंतवडेकर, अंकुश विचारे तसेच खेड नगर परिषदेचे सर्व नगरसेवक, नगरसेविका यांच्या उपस्थितीत संपन्न झाला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

प्रभाग क्रमांक 6 मधील ग्रामस्थ खेडेकर, दिवटे, मोरे, तटकरी, शेठ, जोशी, कवळे, इनामदार, सावंत, गांगन, पवार, गांधी, म्हस्के, घोडे, काते, उपावले, या भूमिपूजन सोहळ्यास उपस्थित होते. योगायोग सोसायटी येथील मोरे घर ते शेठ घरापर्यंत गटाराचे बांधकाम करणे. संत सेना नगर येथील अंतर्गत गटाराचे बांधकाम करणे. खेड नगरपरिषद हद्दीत शिवतर रोड येथील संतोष पवार यांचे घरापासून उदय जोशी घरापर्यंत गटार बांधकरणे आदी कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

टाइम्स स्पेशल

करणे

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg