loader
Breaking News
Breaking News
Foto

संगमेश्वर येथील संभाजी नगर रस्त्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांचे उपोषण सुरू

संगमेश्वर (सत्यवान विचारे) - संगमेश्वर तालुक्यातील नावडी ग्रामपंचायत हद्दीतील संभाजीनगर वस्तीला जाणाऱ्या रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरणाच्या कामासाठी ग्रामस्थांनी वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने अखेर ग्रामस्थांनी आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. या संदर्भात ११ मे रोजी उपोषणाचा इशारा प्रशासनाला देण्यात आला होता. मात्र त्यानंतरही प्रशासनाने याची गंभीर दखल न घेतल्याने सोमवार, दि. ११ मे पासून ग्रामस्थांनी प्रत्यक्ष उपोषणाला सुरुवात केली आहे. आज उपोषणाचा दुसरा दिवस असून अद्याप कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी किंवा लोकप्रतिनिधींनी उपोषणस्थळी भेट दिलेली नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

संभाजीनगर वस्तीला जाणारा रस्ता अनेक वर्षांपासून अत्यंत खराब अवस्थेत असून पावसाळ्यात नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. 40 शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच रुग्णांना या रस्त्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. रस्त्याच्या कामासाठी निधी मंजूर असूनही प्रत्येक्षात कामास सुरुवात होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन रस्त्याचे काम सुरू करावे, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही उपोषणकर्त्यांनी दिला आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg