खेड (इक्बाल जमादार) - आज शनिवार, दिनांक ९ मे रोजी दुपारी साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास अचानक आलेल्या सोसाट्याचा वारा आणि वादळी पावसामुळे दापोली तालुक्यातील सोंडेघर परिसरात मोठे नुकसान झाले आहे. येथील सोंडेघर येथे राहणारे मुकद्दर नांदगावकर यांच्या घरावर नारळाचे माड कोसळल्याने घराचे प्रचंड नुकसान झाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, दुपारच्या सुमारास अचानक वातावरणात बदल झाला आणि विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाला सुरुवात झाली. वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की, मुकद्दर नांदगावकर यांच्या घराशेजारी असलेले नारळाचे झाड मुळासकट उपटून थेट त्यांच्या घरावर पडले. यामुळे घराच्या छताचे आणि भिंतींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून घरातील सामानाचीही नासधूस झाली आहे.
सुदैवाने ज्यावेळी हे झाड कोसळले, त्यावेळी घरातील व्यक्ती सुरक्षित ठिकाणी असल्याने कोणालाही इजा झाली नाही. या नैसर्गिक आपत्तीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. मात्र, नांदगावकर यांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले असून, तसेच कादिर चिपळूणकर यांच्याही बरेच प्रकारे नुकसान झालेला आहे. अशाप्रकारे बऱ्याचश्या घरांचा नुकसान झालेला आहे. प्रशासनाने या घटनेचा पंचनामा करून त्यांना योग्य भरपाई द्यावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून केली जात आहे. तसेच मिळालेल्या माहितीनुसार वीज पुरवठा ही खंडित झालेला आहे व वीज वाहिन्या तुटून पडलेले आहेत आणि रस्त्यावरती माती चिखल आल्यामुळे दुचाकिस्वार घसरून पडत आहेत.
























































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.