loader
Breaking News
Breaking News
Foto

​सावंतवाडीत नवनियुक्त वन्यजीव रक्षकांचा सत्कार व परिसंवादाचे आयोजन

​सावंतवाडी : शासनातर्फे सिंधुदुर्ग जिल्हा वन्यजीव रक्षक म्हणून पुढील तीन वर्षांसाठी नियुक्ती झाल्याबद्दल संजय सावंत (तिलारी) आणि भाग्यश्री परब (रानबांबुळी) यांचा सत्कार मंगळवार, १२ मे रोजी सकाळी ११ वाजता सावंतवाडी येथील काझी शहाबुद्दीन हॉलमध्ये आयोजित करण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याच कार्यक्रमात "जैवविविधता आणि सिंधुदुर्गातील वन्यजीवन" या विषयावर परिसंवाद पार पडणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील हत्ती, गवे व बिबट्यांसारख्या वन्यप्राण्यांचा ग्रामीण जीवनाशी होणारा संघर्ष, तसेच शक्तीपीठ महामार्ग आणि इको सेन्सिटिव्ह गावांबाबत चर्चा केली जाईल.

टाइम्स स्पेशल

​याशिवाय, जिल्ह्यातील व्हिला प्रकल्प, वृक्षतोड, क्रशर्स, अवैध वाळू उपसा आणि मळेवाड-आजगाव परिसरातील प्रस्तावित मायनिंग प्रकल्प यांसारख्या पर्यावरण पूरक बाबींवरही यावेळी मंथन होणार आहे. या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg