दापोली - जिद्द, मेहनत आणि चिकाटी याच्या जोरावर कोणत्याही अडचणींवर मात करता येते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे दापोली तालुक्यातील युवा जिम्नॅस्ट नकुल कारेकर. नुकत्याच पार पडलेल्या आशियाई ट्रॅम्पोलिन जिम्नॅस्टिक्स स्पर्धेच्या निवड ट्रायल्समध्ये नकुलने चौथा क्रमांक पटकावून आपल्या दमदार कामगिरीची छाप उमटवली आहे. विशेष म्हणजे ही कामगिरी त्याने अलीकडेच झालेल्या शस्त्रक्रियेनंतर केली आहे. शस्त्रक्रियेनंतर बहुतांश खेळाडूंना पुनरागमनासाठी अधिक वेळ लागतो. मात्र नकुलने अल्पावधीतच पुनरागमन करत स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली. त्याची ही झुंज आणि चिकाटी इतर युवा खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरत आहे. २३ व २४ मे २०२६ रोजी हाँगकाँग (चीन) येथे होणाऱ्या ७ व्या आशियाई ट्रॅम्पोलिन जिमनॅस्टिक्स वयोगट स्पर्धेसाठी नकुल कारेकर यांची भारतीय संघात निवड झाली आहे.
नकुलने यापूर्वी उत्तराखंडमधील डेहराडून येथे झालेल्या राष्ट्रीय ट्रॅम्पोलिन जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत (१२ वर्षे वयोगट) सुवर्णपदक जिंकत आपली गुणवत्ता सिद्ध केली होती. तसेच त्याने आशियाई ट्रॅम्पोलिन चॅम्पियनशिपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत अंतिम फेरीत सहावा क्रमांक मिळवला होता. ही त्याची पहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा होती. नकुल सध्या हिंजवडीतील श्री स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये प्रशिक्षक श्रीकांत राठोड सरांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. त्याचे पुढील लक्ष्य वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणे असून त्यासाठी तो सातत्याने मेहनत घेत आहे. नकुलच्या या यशाबद्दल त्याचे पालक, प्रशिक्षक तसेच स्थानिक क्रीडा क्षेत्रातून त्याचे कौतुक होत आहे. अडचणींवर मात करत सातत्याने पुढे जाण्याची त्याची जिद्द हीच त्याच्या यशाची खरी गुरुकिल्ली असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
























































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.