loader
Breaking News
Breaking News
Foto

पनवेल तालुका पोलीस ठाण्यात महिला दक्षता समिती मासिक बैठक संपन्न

पनवेल : पनवेल तालुका पोलीस ठाणे येथे हद्दीतील महिला दक्षता समिती सदस्य यांची मासिक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला वपोनि गजानन घाडगे व पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र म्हात्रे यांनी विशेष मार्गदर्शक तसेच सूचना केल्या. त्यामध्ये महिला/ मुली यांची सुरक्षा यावर चर्चा/ मार्गदर्शन केले. सायबर क्राईम, नशा मुक्ती चर्चा/ मार्गदर्शन व सदर बाबत माहिती मिळाल्यास डायल 112 सकाळ संपर्क करणे. शाळा/कॉलेज येथे विद्यार्थीनी यांचे सुरक्षेच्या दृष्टीने महिला वार्डन नेमणे बाबत. उपस्थित शिक्षिका- महिला दक्षता सदस्य यांना सूचना केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

महिला सक्षमीकरण, महिलांचे अडीअडचणी, तक्रारी या करिता पोलीस ठाण्यात महिला पोलीस अधिकारी व महिला पोलीस अंमलदार यांची नेमणूक करण्यात आलेली आहे त्यांची माहिती देण्यात आलेली आहे. महिला दक्षता समिती सदस्य यांच्या अडीअडचणी ऐकून त्यांच्या समस्येचे निराकरण करण्यात आलेले आहे. सदर बैठकीत महिला दक्षता समिती सदस्य व प्रतिष्ठित महिला उपस्थित होत्या.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg