कणकवली (प्रतिनिधी) - कणकवली येथील आप्पासाहेब पटवर्धन चौकाजवळील मुख्य बाजारपेठेतील महापुरुष कॉम्प्लेक्स परिसरात असलेल्या महापुरुष देवस्थान येथील तब्बल दीडशे वर्षे जुन्या भल्या मोठ्या पिंपळ-वटवृक्षाची विशाल फांदी शनिवारी सायंकाळी अचानक कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र रस्त्यालगतच्या दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शनिवारी सायंकाळी 4.15 वा.कणकवली शहरात झालेल्या मुसळधार पाऊस व जोरदार वाऱ्यामुळे ही घटना घडली. भर बाजारपेठेतील रस्त्यावर तसेच दुकानांच्या छपरांवर ही प्रचंड फांदी कोसळल्याने काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. मुख्य बाजारपेठ असल्याने येथे नेहमीच मोठी रहदारी असते; मात्र पावसामुळे त्या वेळी तुलनेने कमी वर्दळ असल्याने मोठी दुर्घटना टळली.
घटनेची माहिती मिळताच कणकवली नगरपंचायत प्रशासन, नगराध्यक्ष संदेश पारकर, माजी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर, सामाजिक कार्यकर्ते राज नलावडे, सौरभ पारकर, चेतन अंधारी, राजा राजाध्यक्ष, महेश कोदे, बंड्या पारकर, अमित भोगटे, गिरीश चव्हाण, आशिष वालावलकर, प्रसाद चव्हाण यांच्यासह नागरिक घटनास्थळी दाखल झाले. नगरपंचायत कर्मचारी मनोज धुमाळे, प्रशांत राणे आणि अन्य कर्मचाऱ्यांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी कटरच्या सहाय्याने युद्धपातळीवर फांदी हटवण्याचे काम हाती घेतले. दरम्यान, झाडाची फांदी कोसळताना विद्युत तारा तुटल्याने शहरातील वीजपुरवठाही खंडित झाला. याबाबतची माहिती संबंधित महावितरण अधिकाऱ्यांना देण्यात आली असून वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या सोबतच नगरपंचायत कडून ट्रॅक्टर व इतर सामग्री तात्काळ दाखल झाली आहे.
























































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.