loader
Breaking News
Breaking News
Foto

चौकुळ येथील महाआरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; २६५ ग्रामस्थांची मोफत तपासणी

​सावंतवाडी (प्रतिनिधी): ग्रामीण भागातील जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात या उद्देशाने चौकुळ येथे आयोजित करण्यात आलेल्या 'महाआरोग्य शिबिरा'ला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या शिबिरामध्ये सुमारे २६५ ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करून त्यांना मोफत औषधोपचार करण्यात आले. दुर्गम भागात अशा प्रकारचे शिबिर आयोजित केल्याबद्दल चौकुळवासीयांनी समाधान व्यक्त केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान (धारगळ), श्रीराम युवा कला क्रीडा मंडळ (आंबोली) आणि फ्रेंड सर्कल युवा मंडळ (चौकुळ) यांच्या संयुक्त विद्यमाने या मोफत आरोग्य तपासणी व औषध वाटप शिबिराचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. ​या शिबिराप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख दिनेश गावडे, आंबोली पंचायत समिती सदस्य मायकल डिसोझा, विजय गवस यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांची व्यवस्थित तपासणी करण्यात आली. चौकुळ, गेळे आणि आंबोली परिसरातील नागरिकांनी या संधीचा लाभ घेतला. "ग्रामीण भागातील लोकांसाठी एकाच छताखाली तपासणी आणि औषधे उपलब्ध झाल्यामुळे वेळेची आणि पैशांची बचत झाली," अशी भावना लाभार्थ्यांनी व्यक्त केली. ​या शिबिराच्या यशस्वीतेसाठी दिनेश गावडे, मायकल डिसोझा आणि विजय गवस यांनी विशेष परिश्रम घेतले असून, भविष्यातही अशाच प्रकारचे सामाजिक उपक्रम राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg