loader
Breaking News
Breaking News
Foto

देवरुख, हातखंबा, पाली, साखरपा पेट्रोल पंपावर पेट्रोल नसल्याने वाहन चालक अडचणीत

देवळे (प्रकाश चाळके) - देवरुख पेट्रोल पंपावर गेले तीन दिवस दोन्ही पंपांना पेट्रोल नसल्याने वाहन चालक मोठ्या अडचणीत सापडले असून आज दिनांक 11 मे रोजी हातखंबा, पाली, साखरपा या भागातील पंपावर पेट्रोलच मिळत नसल्याने वाहन चालकांची फार मोठी अडचण झाली असून पेट्रोल पंपावर पेट्रोल संपल्याचे बोर्ड बघून पुढचा प्रवास कसा करावा या अभिवाचनेत वाहन चालक आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मे महिन्याचा महत्त्वाचा टप्पा आणि महत्त्वाचा सीजन असल्याने लग्न सराई असल्याने मुंबईतील चाकरमान्यांची वर्दळ असून सी.एन.जी. साठी फार मोठ्या रांगाच्या रांगा लागलेल्या दिसतात. पेट्रोल नाही सीएनजी साठी लांब रांगा शेवटच्या टप्प्यात आल्यानंतर सीएनजी संपल्याचे बोर्ड नेमकं काय करावं आणि कसा प्रवास करावा हाच मोठा प्रश्न या भागातील वाहन चालकांना पडला असून याबाबत संबंधित यंत्रणेने त्वरित ही वाहन चालकांची अडचण घालवावी, अशी मागणी या भागातील सर्वच वाहनधारकांची आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg