loader
Breaking News
Breaking News
Foto

सुकदरमध्ये साईबाबा मंदीर जीर्णोद्धार आणि प्राणप्रतिष्ठा सोहळा

दापोली (प्रतिनिधी) - खेड तालुक्यातील सुकदर गावामधील मराठवाडी येथील साईबाबा मंदीराचा जीर्णोद्वार आणि प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार असून यानिमित्ताने तीन दिवस विविध धार्मिक आणि भक्तिमय कार्यक्रम संपन्न होणार आहे. साई मंदिराच्या जीर्णोद्वाराचे कार्य ओम साई नवतरुण मराठा विकास मंडळ संस्थेच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आलेले आहे. ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. या उत्सवानिमित्त मंदिराला आकर्षक रोषणाई आणि मूर्तीभोवती पानाफुलांची सजावट करण्यात येणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मंदिराच्या कलशारोहणानिमित्त बुधवार १३ मे पासून तीन दिवस विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी मूर्ती आगमन सोहळा, गुरुवारी साईबाबा मंदीराचा जीर्णोद्वार, प्राणप्रतिष्ठा आणि उद्गाटन सोहळा होणार आहे. तर शुक्रवारी साई भंडारा आणि सायंकाळी भव्य पालखी मिरवणूक सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. त्यानंतर महाड येथील ह.भ.प. गुरुवर्य श्री संत तपो निधी बाळासाहेब फणसे बाबा.(कल्याण) यांचे कीर्तन होणार आहे. तरी सर्व भाविकांनी उत्सवाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन मंडळातर्फे अध्यक्ष पंढरीनाथ घाडगे यांनी केले आहे.

टाइम्स स्पेशल

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार सुनील तटकरे, शिवसेना नेते रामदास कदम, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, गृहराज्यमंत्री योगेश कदम, माजी आमदार संजयराव कदम, जिल्हा परिषद सदस्य अण्णा कदम, माजी सैनिक अधिकारी अनंत अंबावले यासह तालुक्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg