loader
Breaking News
Breaking News
Foto

मालवणात लोकअदालतीत ५९ प्रकरणे निकाली

मालवण (प्रतिनिधी) - दिवाणी न्यायालय, मालवण येथे आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीत दिवाणी न्यायालयातील प्रलंबित ३० प्रकरणे तसेच वादपूर्व २९ प्रकरणे अशी एकूण ५९ प्रकरणे तडजोडीने मिटवून निकाली काढण्यात आली. या प्रकरणांमधील एकूण रक्कम ९ लाख ७९ हजार ३०५ रुपये ५० पैसे होती. लोकअदालतीत मालवण तालुक्यातील राष्ट्रीयकृत बँका, ग्रामपंचायत तसेच महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीशी संबंधित वादपूर्व प्रकरणांचा समावेश होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सदर लोकअदालतीसाठी विशेष पॅनेल नियुक्त करण्यात आले होते. पॅनेल प्रमुख म्हणून दिवाणी न्यायाधीश तथा तालुका विधी सेवा समिती, मालवणचे अध्यक्ष मोहम्मद कैसर फकिह यांनी काम पाहिले. विधिज्ञ एस. यू. पराडकर यांनी पॅनेल सदस्य म्हणून सहभाग घेतला. लोकअदालतीच्या यशस्वी आयोजनासाठी न्यायालयाचे सहायक अधीक्षक एम. एम. मोर्ये, लघुलेखक डी. डी. तिबिले, वरिष्ठ लिपिक यू. एन. मालणकर, कनिष्ठ लिपिक एस. व्ही. परब, एस. व्ही. जाधव, एल. आर. कांबळी, सी. एम. गोसावी, एम. पी. जाधव तसेच पी. ए. तारी व डी. एस. चव्हाण यांनी सहकार्य केले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg