loader
Breaking News
Breaking News
Foto

बोरीवलीत 'श्री साई-सातमाई चषक २०२६' चा दिमाखात शुभारंभ; पहिल्याच दिवशी क्रिकेटचा थरार

दापोली (सागर गोवळे) - येथील कपिलादेवी मैदानावर 'श्री साई - सातमाई क्रिकेट संघ' आयोजित भव्य मर्यादित षटकांच्या क्रिकेट स्पर्धेचा आज अतिशय उत्साहात प्रारंभ झाला. स्वर्गीय रमेश शंकर बैकर यांच्या प्रेरणेतून दरवर्षीप्रमाणे आयोजित केल्या जाणाऱ्या या स्पर्धेचे हे सातत्यपूर्ण वर्ष असून, आज सकाळपासूनच क्रिकेट प्रेमींची मैदानावर मोठी गर्दी पाहायला मिळाली. ​आज सकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून आणि खेळपट्टीचे पूजन करून स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. यावेळी स्थानिक प्रतिष्ठित नागरिक, आयोजक आणि खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते. ​११ मे ते १३ मे या तीन दिवसांच्या कालावधीत चालणाऱ्या या स्पर्धेत ३२ संघांना प्राधान्य देण्यात आले आहे. स्पर्धेतील विजेत्यांसाठी आकर्षक रोख बक्षिसे आणि चषक ठेवण्यात आले आहेत: प्रथम पारितोषिक: ₹१८,०००/- व चषक, द्वितीय पारितोषिक: ₹१०,०००/- व चषक, ​तृतीय पारितोषिक: ₹५,०००/- व चषक, ​चतुर्थ पारितोषिक: ₹३,०००/- व चषक...​याशिवाय उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाजासाठी देखील प्रत्येकी ₹५००/- व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी स्थानिक संघांमध्ये चुरशीचे सामने पाहायला मिळाले. ४ षटकांच्या या सामन्यांमध्ये फलंदाजांनी चौकार-षटकारांची आतिषबाजी केली, तर गोलंदाजांनी देखील आपल्या प्रभावी माऱ्याने फलंदाजांना रोखून धरले. शिस्तबद्ध आयोजन आणि नियमावलीमुळे खेळाडूंमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. ​ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अक्षय बैकर, संजय बोरघरे, अनिल बोरघरे, गौरव बैकर, करण बैकर, तुषार बैकर, सुरज बैकर आणि प्रदीप बैकर यांच्यासह श्री साई - सातमाई क्रिकेट संघाचे सर्व सदस्य विशेष परिश्रम घेत आहेत. ​येत्या १३ मे रोजी या स्पर्धेचा महाअंतिम सोहळा पार पडणार असून, 'आडीवाडीचा राजा' कोण ठरणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg