loader
Breaking News
Breaking News
Foto

दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावांना वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले

दोडामार्ग (प्रतिनिधी) - गेल्या काही दिवसापासून वाढत्या तापमानामुळे दोडामार्ग तालुक्यातील जनता ञस्त झाली असताना गुरूवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ढगांच गडगडाटासह विजेचा लखलखाट वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसाने दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावांना झोडपून काढले. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. पण झालेल्या या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या लोकांना थोडासा दिलासा मिळाला आहे. तर दोडामार्ग ते विजघर मुख्य मार्गावर तिलारी येथे झाड पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. जेसीबी मशीन लावून झाड केले बाजूला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दोडामार्ग तालुक्यात दुपारी तापमान वाढ झाली होती. अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. दुपारी चार वाजल्यापासून आकाशात ढग दाटून आले असताना 5 वाजता काळा अंधार पडत अचानक ढगांच्या गडगडाट, विजांचा लखलखाट वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचे आगमन झाले. तिलारी दशक्रोशीतील अनेक गावात तिलारी, कोनाळकट्टा, साटेली भेडशी, बोडदे, खानयाळे, उसप, पिकुळे, मांगेली, दोडामार्ग, झरेबांबर, सासोली, मणेरी, इतर गावात पावसाने जोरदार झोडपून काढले. अचानक आलेल्या पावसाने दुचाकी वाहन धारकांची तारांबळ उडाली, ठिकठिकाणी आसरा घेऊन पाऊस जाईपर्यंत प्रतिक्षा करावी लागली. अर्धा ते पाऊण तास पावसाचा धुमाकूळ सुरू होता.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg