loader
Breaking News
Breaking News
Foto

निवळी येथे श्री वाघजाई ग्रामदेवता मंदिराच्या पहिल्या वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन

संगमेश्वर (सत्यवान विचारे) - संगमेश्वर तालुक्यातील निवळी येथे श्री वाघजाई ग्रामदेवता मंदिराचा पहिला वर्धापन दिन सोहळा मंगळवार दिनांक १४ मे २०२६ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याची सुरुवात सकाळी धार्मिक विधी, महाअभिषेक आणि पालखी मिरवणुकीने होणार असून, दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सायंकाळी महिला मंडळाच्या सहभागातून हळदी-कुंकू कार्यक्रम, हरिपाठ आणि रात्री भजनाचा कार्यक्रम होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कार्यक्रमासाठी परिसरातील भाविक, ग्रामस्थ तसेच महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून, निवळी गावात भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे. या सोहळ्यास सर्व भाविकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री ग्रामदेवता मंदिर जिर्णोद्धार समिती, ग्रामस्थ व महिला मंडळ निवळी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg