loader
Breaking News
Breaking News
Foto

ओशिवळे मसुरकरवाडीत उबाठा पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

राजापूर - ओशिवळे मसुरकरवाडी ता. राजापूर येथील उबाठा पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत माझ्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे राजापूर तालुक्यात शिवसेनेची ताकद आणखी वाढली आहे. यावेळी मी नवप्रवेशितांचे शिवसेनेत स्वागत करत पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याचे आवाहन केले. “सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी आणि विकासासाठी शिवसेना कायम कटिबद्ध आहे. गावागावातील विकासकामांना गती देत जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही,” असे यावेळी बोलताना सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी या कार्यक्रम प्रसंगी विधानसभा क्षेत्र प्रमुख राजू कुरूप, युवा सेनेच्या नेत्या अपूर्वा ताई सामंत, तालुकाप्रमुख दीपक नागले सभापती नंदनी कदम, सुनील गुरव, प्रतीक मटकर, उमेश पराडकर, चंद्रकांत जानकर, मनीष लिंगायत, महादेव गुरव, प्रल्हाद नारकर, आबा आडिवरेकर, रवींद्र नागरेकर, सूर्यकांत चव्हाण, प्रसाद गुरव, गौरव सौरप, योगेश चव्हाण, आर. डी. सी. चे संचालक मंदार सप्रे, गावचे मानकरी कुलकर्णी गुरुजी यांच्याशी गावातील प्रमुख मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg