loader
Breaking News
Breaking News
Foto

कळंबोलीत बीट मार्शलने बुडणाऱ्या महिलेचा वाचवला जीव, पोलीस शिपाई आकाश माळीची धाडसी कारवाई

कळंबोली : रविवारी कंट्रोल रूम येथून बीट मार्शल १ च्या म.डी.टी. वर १२.३० वाजता संदेश प्राप्त झाला की रोडपाली गणपती विसर्जन तलावमध्ये एक महिलेने पाण्यात उड़ी मारली असून तिला पोलीस मदतीची आवश्यकता आहे. सदरचा संदेश प्राप्त होताच कामगिरीवर तैनात असलेले बीट मार्शल आकाश माळी यांनी त्वरित अवघ्या तीन मिनिटात रोडपाली तलावाजवळ जाऊन बुडणाऱ्या महिलेचे थरारकरीत्या स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पाण्यातून बाहेर काढून जीव वाचवला. या धाडसी अन थरारक कामगिरीची दखल वरिष्ठांनी घेऊन आकाश माळी यांना कौतुकाची थाप दिली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कळंबोली पोलीस ठाणे बीट मार्शल 1 वरिल पो शिपाई आकाश माळी आणि सागर वानखेडे हे ताबडतोब घटनास्थळी पोहोचले. त्याना तलावामध्ये पाण्यात उड़ी मारलेली महिला बूड़त असल्याचे दिसल्याने पोलीस शिपाई आकाश माळी याने जिवाची पर्वा न करता तात्काळ पाण्यात उडी मारून सदर महिलेस तलावातून सुखरूप बाहेर काढले आणि आशा हॉस्पिटल येथे पोलीस गाडीत बसून उपचारासाठी दाखल केले. रोडपाली तलावात उडी मारणाऱ्या महिलेचे नाव अनिता बालाजी नांदे (वय ३५ वर्ष) असून ती मुरली वसाहतीमध्ये राहत आहे. सदर महिला मनोरुग्ण असल्याचे समजते. डॉक्टरांनी तपासून प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले आहे. हॉस्पिटलमध्ये महिलेचा भाऊ हजर झाला असून पुढील उपचारासाठी MGM हॉस्पिटल येथे पोलीस गाडीने उपचारासाठी रवाना केले आहे.

टाइम्स स्पेशल

स्वतःचा जीव धोक्यात घालून रोडपाली तलावात बुडणाऱ्या महिलेचा जीव वाचवणाऱ्या बिट मार्शल आकाश माळीचे कळंबोलीतील विविध स्तरातून अभिनंदन केले जात आहे. रोडपाली तलावात महिलेने पाण्यात उडी मारली असल्याचा संदेश प्राप्त होताच अवघ्या तीन मिनिटात घटनास्थळी दाखल होऊन पाण्यात बुडणाऱ्या महिलेचे पोलीस शिपाई आकाश माळी यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता तलावात उडी मारून बाहेर काढून जीव वाचवले. कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांनी आकाश माळी यांनी केलेल्या धाडसी आणि थरारक कामगिरीची शाबासकी अन कौतुकाची थाप देऊन मनोबल उंचावले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg