loader
Breaking News
Breaking News
Foto

पनवेल तालुका पोलीस ठाण्यातील जितेंद्र म्हात्रे यांना पोलीस उपनिरीक्षक पदी बढती

पनवेल - तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे जितेंद्र विठ्ठल म्हात्रे यांना महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागातर्फे पोलीस उपनिरीक्षक पदाची बढती देण्यात आली आहे. जितेंद्र विठ्ठल म्हात्रे हे १/०१/१९९३ साली पोलीस खात्यात कॉन्स्टेबल म्हणून भरती झाले. प्रथम त्यांनी रायगड जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात कामकाज पहिले. त्यानंतर त्याची बदली नवी मुंबई आयुक्तालयात झाली. यामध्ये विशेष शाखा, खंडणी विरोधी पथक, गुन्हेशाखा, विविध पोलीस ठाणे येथे कार्यरत राहून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. या कामाची दखल शासनाने घेऊन त्यांना २०२५ साली राष्ट्रपती पदक देण्यात आले. सध्या ते पनवेल तालुका पोलीस ठाणे येथे कार्यरत असताना त्यांना पोलीस उपनिरीक्षक पदाची बढती देण्यात आल्याने सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg