संगलट खेड (इक्बाल जमादार) - दापोली तालुक्यातील कोंढे गावातील शेरी मैदानावर प्रवीण शिंदे मित्र मंडळाच्या वतीने आयोजित क्रिकेट स्पर्धेत खेड-लवेल येथील अस्माई इलेव्हन संघाने विजेतेपद पटकावले, तर यजमान कोंढे संघ उपविजेता ठरला. करंजाळी संघाने तृतीय क्रमांक मिळवला. या स्पर्धेत तालुक्यातील २४ संघांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे उद्घाटन गावपाटील शंकर पाटील, दिनेश पाटील, संतोष पाटील आणि काशिनाथ कदम यांच्या हस्ते करण्यात आले. प्रथम क्रमांकासाठी रु. १८ हजारांचे पारितोषिक जनकल्याण ग्रामीण बिगरशेती पतसंस्था मर्यादित, असोंडचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी दिले. द्वितीय क्रमांकासाठी रु. १० हजारांचे पारितोषिक मनोज राजाराम घोडेराव यांनी, तर तृतीय क्रमांकासाठी रु. ५ हजारांचे पारितोषिक विनोद भगवान दळवी यांनी दिले.
प्रथम क्रमांकाची ट्रॉफी ईशान संदीप कदम यांनी, द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी संतोष राजाराम घोडेराव यांनी, तर तृतीय क्रमांकाची ट्रॉफी मुदस्सर माखजनकर यांनी प्रदान केली. या स्पर्धेचे आयोजन प्रवीण शिंदे, सुभाष रहाटे, विनेश पाटील, राज जाधव, चिराग दळवी, अनुराग घोडेराव आणि सुमित कासारे यांनी केले होते. मैदानासाठी नरेश कासारे, हरिश्चंद्र कासारे, शंकर पाटील आणि संतोष पाटील यांनी सहकार्य केले. सलग चौथ्या वर्षी ही स्पर्धा शेरी मैदानावर आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेसाठी अविनाश दळवी, दशरथ जाधव, विश्वनाथ दळवी, डॉ. विनोद घोडेराव आणि प्रभाकर कदम यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दुर्वा स्पोर्ट सुयोग लाले आणि टीम यांनी केले, तर ध्वनी व्यवस्था बाळाराम कोळंबे यांनी सांभाळली. पाणी व्यवस्थेसाठी शुभम घोडेराव आणि संतोष घोडेराव यांनी विशेष सहकार्य केले. बक्षीस वितरण समारंभासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजाराम घोडेराव, इकबाल जमादार, मुजीब नाडकर, नथुराम कासारे, जुल्फिकार नाडकर, रमेश कासारे आदी मान्यवर उपस्थित होते.
























































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.