loader
Breaking News
Breaking News
Foto

काजू-बी शेतमाल तारण योजनेचा शुभारंभ

रत्नागिरी - रत्नागिरी जिल्हा कृषि उत्पन्न बाजार समितीने मागील दोन वर्ष सातत्याने पाठपुरावा करुनही काजूबी शेतमाल तारण योजनेचा निधी उपलब्ध न झाल्या कारणाने सदरयोजना कार्यान्वीत करता आली नाही. मात्र समितीचे सभापती संदीप सुर्वे यांनी या वर्षी माहे फेब्रु. २६ पासूनच सदर योजनेसाठी लागणा-या निधीसाठी मा. पणन मंडळ पुणे यांचेकडे पाठपुरावा करून माहे मे. २६ मध्ये सदर योजनेच्या निधीची रक्कम जमा होताच दिनांक ०९/०५/२०२६ रोजी दिनकर गणपती पाटील मु.पो. देवरुख, जि. रत्नागिरी यांचेकडील बी तारणात घेऊन तारण कर्जाचा धनादेश पाटील यांचेकडे सुपूर्त करणेत आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सदर धनादेश प्रदान करतेवेळी बाजार समितीचे जेष्ठ संचालक हेमचंद्र यशवंत माने व समितीचे मा.सचिव पांडूरंग जयराम कदम व कर्मचारी वर्ग उपस्थित होता. येत्या काही दिवसात काजू-बी तारण प्रक्रीयेत जास्तीत जास्त शेतक-यांना सामावून घेणार असल्याचे मत मा. सभापती संदीप सुर्वे यांनी व्यक्त केले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg