बांदा (प्रतिनिधी) - राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या इन्सुली तपासणी नाका पथकाने गोवा-मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर मोठी कारवाई करत तब्बल १ कोटी २३ लाख ६८ हजार रुपयांचा अवैध मद्यसाठा व वाहतूक करणारे वाहन जप्त केले. ही कारवाई बांदा येथील खालसा पंजाबी ढाब्यासमोर करण्यात आली. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार ८ मे २०२६ रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या टाटा कंपनीच्या सहाचाकी मालवाहू वाहनाची तपासणी करण्यात आली. वाहन क्रमांक CG-04-PQ-0335 मधील मोठ्या लाकडी पेट्यांमध्ये गोवा बनावटीच्या विदेशी मद्याच्या बाटल्या आढळून आल्या. तपासणीत १८० मिली मापाच्या ४८ बाटल्यांचे एकूण १०८० बॉक्स, म्हणजेच ५१ हजार ८४० बाटल्या अवैधरित्या वाहतूक होत असल्याचे उघड झाले.
या प्रकरणी वाहन चालक पंकज गोविंद व्यास (वय ३३, रा. डांगराखेडा, जि. देवास, मध्यप्रदेश) यास ताब्यात घेण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या मद्याची किंमत सुमारे १ कोटी ३ लाख ६८ हजार रुपये असून वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या वाहनाची किंमत २० लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई दुय्यम निरीक्षक धनंजय सालुंखे, विवेक कदम, निर्मल माळी, रणजित शिंदे तसेच जवानांच्या पथकाने केली. पुढील तपास इन्सुली तपासणी नाका पथकाकडून सुरू आहे.
























































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.