loader
Breaking News
Breaking News
Foto

आडाळी येथील श्री देवी माऊली पुन प्रतिष्ठापना कार्यक्रमाची संधी उचलत घरातील ८० हजाराचा हार चोरीला

दोडामार्ग (प्रतिनिधी) - दोडामार्ग तालुक्यात घरात कुणी नाही ही संधी साधून सराईत चोरटे घरफोडी करून रोख रक्कम दागिने चोरी करत आहेत. रविवारी आडाळी येथील श्री देवी माऊली मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा असल्याने घरातील कुटुंब मंदिरात गेले ही संधी साधून अज्ञात चोरट्यांनी दुपारी 1.30 ते 3.45 दरम्यान भरत लक्ष्मण सावंत यांच्या घरात शिरून ८० हजार रुपये किमतीचा हार चोरून नेला यामुळे खळबळ उडाली आहे. वाढत्या चोऱ्या लक्षात घेऊन लोकांनी आपले दागिने, रोख रक्कम बॅक लाॅकर मध्ये ठेवावी, असे आवाहन दोडामार्ग पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आडाळी येथील घरफोडी बाबत पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांनी सांगितले. भरत लक्ष्मण सावंत कुटुंब आडाळी येथील श्री देवी माऊली मंदिरात गेले होते. ही संधी साधून अज्ञात चोरट्यांनी घराचा दरवाजा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश करुन कपाटात ठेवलेला वापरता हार (किमंत ८० हजार रुपये) चोरून नेला अशी फिर्याद भरत सावंत यांनी दिली आहे. दरम्यान दोडामार्ग पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांनी दोडामार्ग तालुक्यातील नागरीकांना आवाहन केले आहे. सर्वत्र घरफोडी चोऱ्या होत आहेत तेव्हा सर्व लोकांना विनंती आहे की घरामध्ये सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम ठेवून बाहेर कुठे जाऊ नये.रोख रक्कम बँकेमध्ये ठेवावी व दागिने सुरक्षित ठिकाणी ठेवावेत त्यासाठी बँक लॉकर्स चा सुद्धा वापर करता येईल असे म्हटले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg