loader
Breaking News
Breaking News
Foto

शेर्लेच्या सरपंच प्रांजल जाधव यांना ‘ग्रामरत्न सरपंच पुरस्कार २०२६’ प्रदान

सावंतवाडी (प्रतिनिधी) - महाबळेश्वर (पाचगणी) येथे पंचायत राज विकास मंच संचलित अखिल भारतीय सरपंच परिषदेचा ग्रामरत्न सरपंच पुरस्कार २०२६ शेर्ले ग्रामपंचायत सरपंच प्रांजल प्रशांत जाधव यांना सन्मानीत करण्यात आला. यावेळी प्रमुख उपस्थिती महराष्ट्र उत्पन्न बाजार समिती उपाध्यक्ष हुकूमचंद आमदारे, शिव व्याख्याते व शाहू, फुले, आंबेडकर विचारवंत संभाजी मोहिते, महाराष्ट्र सरपंच परिषद संघटनेचे अध्यक्ष जयंतदादा पाटील, ए. आय मार्गदर्शक अमेय पांगरकर, दीपक हिंगे पाटील, विलास गाडगे, उद्योजक प्रदीप जाधव, ऋतुजा शिंदे (सभापती महिला बाल कल्याण विभाग जि. प. सातारा) डॉ. रामजी अडकेकर (पुणे) अमेय जोशी (पुणे CSR फण्ड व लोकसहभाग) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

जाधव म्हणाल्या हा सन्मान माझा एकटीचा नसून माझ्या शेर्ले गावचा व गावातील सर्व ग्रामस्थानचा आहे, तसेच माझ्या सर्व ग्रामपंचायत सदस्य, सर्व कर्मचारी, ग्रामपंचायत अधिकारी यांचा आहे. तसेच आमचे मार्गदर्शक खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार दिपक केसरकर, आमदार निलेश राणे, जिल्हाप्रमुख संजू परब, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत तसेच माजी सरपंच उदय धुरी, तालुका प्रमुख बबन राणे यांचे नेहमी सहभाग व सहकार्य लाभले असे त्यांनी सांगितले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg