loader
Breaking News
Breaking News
Foto

नवनिर्वाचित विधानपरिषद सदस्य प्रमोद जठार यांचे सावंतवाडीमध्ये जंगी स्वागत

सावंतवाडी (प्रतिनिधी) - पालघर ते सिंधुदुर्ग जिल्हा पर्यंत भाजप संघटना बळकट करण्यासाठी काम करणार आहे तर माझी आमदारकी ही भाजपच्या नव्या व जुन्या कार्यकर्त्यांना समर्पित असून नेत्यांच्या आशीर्वादाने जनहितार्थ काम करणार आहे, असे विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार प्रमोद जठार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ते म्हणाले, पुढची ६ वर्ष शतप्रतिशत भाजपसह कोकणच्या विकासाला प्राधान्य देत उरला सुरला बॅकलॉग सरकारचा दुवा बनून भरून काढेन, असा विश्वास भाजपचे विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार प्रमोद जठार यांनी व्यक्त केला. तसेच आमच्यात गट नाही, भाजप हाच आमचा गट असल्याचा दावाही त्यांनी केला. सावंतवाडी येथील भाजप कार्यालयात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सावंतवाडी भाजप मध्यवर्ती कार्यालयात सावंतवाडीतील पदाधिकाऱ्यांकडून आम. जठार यांचे जंगी स्वागत करण्यात आले. हार, पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी आम. जठार म्हणाले, देशात भाजपला कार्यकर्त्यांच्या ताकदीवर यश मिळालं असून १०० वर्षांच्या त्यागाचे हे फळ आहे. माझ्या पदाचा फायदा हा पक्षाला व जनतेला करून देण्यासाठी माझा भर आहे. मी जनतेचा दुवा बनून काम करत राहणार आहे. मुख्यमंत्री, भाजप प्रदेशाध्यक्ष, खासदार, पालकमंत्री व जिल्हाध्यक्ष यांच्या माध्यमातून पालघर ते सिंधुदुर्गचा समन्वयक म्हणून मी काम करेन असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, दोन ठिकाणी स्वागता वरून छेडलं असता ते म्हणाले, आमच्यात गट नाहीत, भाजप हाच आमचा गट आहे. राष्ट्र प्रथम हा विचार जपणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. कोकणातील रोजगारावर आमचा भर असून इथल्या तरूण- तरुणी बाहेर जाता नयेत यासाठी माझा पहिला प्रयत्न राहील, येत्या काळात कोकणात रोजगार उभा राहिलेला दिसेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टाइम्स स्पेशल

तसेच सगळेच भाजपात येऊन जयघोष करताना दिसतील असाही टोला विरोधकांना हाणला. आरोग्य प्रश्नांवर देखील काम करायचे आहे. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले, भाजप सरचिटणीस महेश सारंग, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, युवराज लखमराजे भोंसले, शहराध्यक्ष सुधीर आडीवरेकर, मनोज नाईक, रवींद्र मडगावकर,आनंद नेवगी, प्रतिक बांदेकर, ॲड. परिमल नाईक, अशोक सावंत, माजी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, रवी मडगावकर, नीलम नाईक, सुनिता पेडणेकर,दादू कविटकर, महेश धुरी आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मंडल अध्यक्ष संतोष राऊळ यांनी स्वागत केले तर बांदा मंडल अध्यक्षपदी मधुकर देसाई यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे पत्र आमदार जठार यांच्या हस्ते देण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg