loader
Breaking News
Breaking News
Foto

हर्णे गावात भिषण पाणी टंचाई, मात्र पाईपलाईनमधून पाणी जातेय वाया

दापोली (प्रतिनिधी) - हर्णे प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेच्या पाईप लाईनला शिवाजीनगर गावधनी हद्दीत अगदी हम रस्त्याच्या लगतहून जाणाऱ्या पाईप लाईनला पाण्याची मोठी गळती लागली आहे. एकच पाईप ३ ठिकाणी फुटलेला आहे. त्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. फुटलेल्या पाईपची दुरुस्ती किंवा तो पाईप बदलून टाकणे क्रमप्राप्त असताना पाईप बदलून नवीन पाईप टाकण्याचे काम केले जात नाही किंवा पाईपाला पॅच मारून पाईप दुरुस्तही केला जात नाही. त्यामुळे मोठ्याप्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरूच आहे. त्यामुळे रहिवाशांना पाणीपुरवठा सुरळीतपणे होत नाही. दर १५ दिवसांनी एकदाच पाणी सोडले जात असल्याने हर्णे गावातील रहिवाशांना पाणी टंचाईच्या भिषण संकटाला सामोरे जावे लागत आहे. त्यातच पाण्याचा पंप अहोरात्र सुरू असल्याने विजेचे बिल मात्र उगाच वाढत आहे. तर दुसऱ्या बाजूला मात्र पाण्यासाठी रहिवाशांना टाहो करावा लागत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दापोली तालुक्यातील हर्णे पाळंदे, पाजपंढरी, अडखळ तसेच शिवाजीनगर या चार गावांना पाणीपुरवठा करणा-या हर्णे प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेची जॅकवेल हर्णे या गावापासून सुमारे 22 किलोमीटर लांब अंतरावरील बांधतिवरे येथे आहे. बांधतिवरे येथील जॅकवेल मधून पंपाव्दारे किरांबा येथील पाण्याच्या टाकीत पाणी आणले जाते. किरांबा येथून नंतर हर्णे, पाळंदे, अडखळ, म्हैसोंडे, शिवाजीनगर तसेच पाजपंढरी येथे पाणी सोडले जाते. हर्णे या गावाला ऐतिहासिक वारसा लाभला असून या गावाची लोकसंख्येच्या खुपच मोठी आहे. हर्णे येथे एकुण 26 वाडया आहेत. हर्णे गावाची सण 2011 च्या जनगणनेनुसार 7,274 एवढी लोकसंख्या असली तरी आता 15 वर्षात त्यात मोठीच वाढ झाली आहे. अशा या हर्णे गावाला खेम धरणातून तसेच बांधतिवरे येथून पाणी पुरवठा करणा-या नळपाणी पुरवठा योजना आहेत. या दोन नळपाणी योजनांपैकी खेम धरण जानेवारी महिन्यातच पुर्णपणे आटल्याने हर्णे गावाची पाणी पुरवठ्याची पूर्णपणे भिस्त बांधतिवरे येथील योजनेवरच अवलंबून आहे. अशा या हर्णे गावाला सध्या महिन्यातून दोनदा आणि पंधरा दिवसातून एकदाच पाणी सोडले जात असल्याने हर्णे येथे राहणाऱ्या रहीवाशांसमोर पाण्याचे भिषण संकट उभे ठाकले आहे.

टाइम्स स्पेशल

बांधतिवरे येथून हर्णे येथे आलेल्या पाण्याच्या पाईपची लाईन ही जीर्ण झाल्याने ही पाईप लाईन ठिक ठिकाणी लिकेज होत असते. लिकेज होत असलेल्या पाईप लाईनला कुठे आणि किती वेळा ठिगळ लावणार, असे झाले आहे. त्यातच शिवाजीनगर गावधनी हद्दीतून पुढे गेलेल्या एका पाईप लाईनला ३ भगदाड पडली असून तीन महिन्यांपासून या एकाच पाईपमधून जोरदारपणे पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या पाण्याच्या विसर्गामुळे तेथे पाण्याच्या साठवणुकिचे तळे साचत आहे हे सर्व पाणी वापराविना वाया जात आहे. त्यामुळे पाण्याचा उपसा करण्यासाठी वापरण्यात येणा-या पंपाच्या विदयुत बिलाचे पैसे नाहक वाया जात आहेत. याचा भुर्दंड नाहकपणे पाणी पट्टी धारकांना बसणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg