पनवेल - थोर समाजसुधारक स्वर्गीय जनार्दन भगत साहेबांनी आपले संपूर्ण आयुष्य 'बहुजन हिताय, बहुजन सुखाय' या तत्त्वासाठी वेचले. त्यांच्या अथांग कार्यामुळेच आपल्या परिसराला नावलौकिक प्राप्त झाला आहे, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी गुरुवारी शेलघर येथे केले. स्वर्गीय जनार्दन भगत यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या शेलघर येथील निवासस्थानी आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. थोर समाजसुधारक स्वर्गीय जनार्दन भगत यांच्या पुण्यतिथीनिमित्त गुरुवारी स्वर्गीय जनार्दन भगत यांच्या शेलघर येथील निवासस्थानी भाजपचे प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, शकुंतला ठाकूर, काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते तथा नगरसेवक परेश ठाकूर यांनी भगत साहेबांच्या पवीत्र स्मृतीस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
जनार्दन भगत यांनी शिक्षण आणि न्यायदानाचे महत्त्वपूर्ण कार्य करून सर्वसामान्य माणसाला आधार दिला. गावांमधील तंटे सोडवताना कोणावरही अन्याय होणार नाही याची त्यांनी नेहमीच सामाजिक भूमिकेतून काळजी घेतली, अशा शब्दांत मान्यवरांनी त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला. या अभिवादन सोहळ्यासाठी भाजप जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, संजय भगत, पंचायत समिती सदस्या जिज्ञासा कोळी, माजी सदस्य भाऊशेठ पाटील, रत्नप्रभा घरत, वर्षा ठाकूर, माजी नगरसेवक अनिल भगत, तेजस कांडपिळे, वसंतशेठ पाटील, अरुणशेठ ठाकूर, जयवंत देशमुख, जितेंद्र म्हात्रे, विश्वनाथ कोळी, माजी उपसरपंच सचिन घरत, अशोक कडू यांच्यासह स्वप्निल ठाकूर, कृपेश कांडपिळे, प्रकाश भगत, अजय भगत आणि इतर अनेक पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
























































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.