loader
Breaking News
Breaking News
Foto

रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल, खेडची देशपातळीवर दैदिप्यमान कामगिरी

खेड (प्रतिनिधी) - माहे एप्रिल 2026 मध्ये घेण्यात आलेल्या जे.ई.ई., बी.आर्च. परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूलची विद्यार्थिनी कु. जिया मेहता हिने अभूतपूर्व यश संपादन करत भारतामध्ये द्वितीय क्रमांक (जनरल-इडब्ल्यूएस कॅटेगरी) पटकावला आहे. कु. जिया हिने 99.97 पर्सेंनटाईल गुण मिळवून खेड शहरासह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले आहे. कु. जियाने सातत्यपूर्ण अभ्यास, प्राध्यापकांचे मार्गदर्शन आणि मेहनतीच्या जोरावर हे यश संपादन केले. जे.ई.ई बी. आर्च. ही देशातील अत्यंत स्पर्धात्मक परीक्षा आहे. अशा कठीण परीक्षेत देशात द्वितीय क्रमांक मिळविणे ही सर्वांसाठीच अभिमानाची बाब आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कु. जिया हिला उच्च माध्यमिक विभागप्रमुख राहुल गाडबैल तसेच शाळेतील प्राध्यापक रोहन खेडेकर, मानसी देवघरकर, गुरुप्रसाद देवघरकर, शुभम जड्याळ, राजेश जाधव, अनिल सिंग व तिचे पालक यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. संस्थेचे चेअरमन बिपीनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कु. जियाचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg