संगमेश्वर (सत्यवान विचारे) - संगमेश्वर तालुक्यातील कळंबस्ते गावातील हाक्रवणेवाडी येथे वीज पडून जर्सी गाय दगावल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेत पशुपालक शांताराम लक्ष्मण सनगरे यांचे अंदाजे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ९ मे रोजी परिसरात जोरदार पाऊस आणि विजांचा कडकडाट सुरू असताना शांताराम सनगरे यांच्या घराशेजारी उभी असलेल्या जर्सी गाईवर अचानक वीज कोसळली. यात गायीचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच कळंबस्ते गावचे तलाठी आकाश वावरे तसेच कळंबस्ते व भीमनगरच्या पोलीस पाटील स्नेहा निखिल मोहिते यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. प्राथमिक पंचनाम्यानुसार मृत जर्सी गायीची किंमत सुमारे ५० हजार रुपये असल्याचे नमूद करण्यात आले असून, संबंधित अहवाल पुढील कार्यवाहीसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरातील पशुपालकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
























































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.