loader
Breaking News
Breaking News
Foto

मुंबई-गोवा महामार्गावर खवटी रेल्वे ब्रिज येथे टेम्पो ट्रॅव्हल्स नियंत्रण सुटून अपघात, चार जण जखमी

खेड (दिलीप देवळेकर) : मुंबई-गोवा महामार्गावर खवटी रेल्वे ब्रिज येथे मुंबईवरून गणपतीपुळे येथे जात असलेले टेम्पो ट्रॅव्हल्स चालकाचे नियंत्रण सुटून अपघात झाला. सदर अपघातात चार प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. सदर घटनेची माहिती मिळताच भरणे नाका ब्रिज खाली उभी असलेली जगद्गुरु रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी संस्थान नाणिज धाम २४ तास अपघात मदतीसाठी सेवेस असलेली विनामूल्य रुग्णवाहीका तात्काल घटनास्थळी पोचली व अपघातग्रस्त अनु विनायक कोलमकर (वय ३८) रा. दहिसर, त्रिशा अनिल सिंग (८ वर्ष) रा. दहिसर, गुंजन अनिल सिंग (वय ११) मुंबई दहिसर, अनिल श्रीशंकर सिंग (वय ३८) मुंबई दहिसर यांना घेऊन उपजिल्हा रुग्णालय कळंबणी येथे दाखल केले आहे. रुग्णवाहीका चालक सुरज हंबीर यांनी मदत कार्य केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg