मालवण (प्रतिनिधी) - स्वच्छ सुंदर मालवण शहर या संकल्पनेतून तसेच पर्यावरण संवर्धन व जनजागृती या दृष्टीकोनातून मालवण नगरपरिषदेच्या वतीने चिवला बीच येथे विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन मंगळवारी करण्यात आले. नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित या स्वच्छता मोहिमेत लोकप्रतिनिधी, स्थानिक नागरिक व विविध सामाजिक संस्था यांनी उत्स्फूर्त पणे सहभाग घेतला. दरम्यान, तीन ट्रॅक्टर कचरा यावेळी गोळा करण्यात आला. प्लास्टिक बॉटल वं प्लास्टिक कचरा याचा समावेश अधिक होता. तरी प्लस्टिक मुक्त मालवण शहर यां संकल्पनेनुसार शहरात प्लास्टिक कचरा होणार नाही याची काळजी सर्वांनी घेऊया. असे आवाहन नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी यां निमित्ताने केले.
यावेळी मुख्याधिकारी प्रतीक थोरात, उपनगराध्यक्ष दिपक पाटकर, बांधकाम सभापती सहदेव बापार्डेकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण, महिला बालकल्याण सभापती अन्वेशा आचरेकर, उपसभापती अश्विनी कांदळकर, समाजकल्याण सभापती सिद्धार्थ जाधव, नगरसेविका दर्शना कासवकर, शर्वरी पाटकर, मेघा सावंत, भाग्यश्री मयेकर, महानंदा खानोलकर यांसह लायन्स क्लब अध्यक्ष अनुष्का चव्हाण, बाळू अंधारी, अवधूत चव्हाण, रोटरी क्लब अध्यक्ष पंकज पेडणेकर, प्रसन्न मयेकर, भाई कासवकर, अँड. ऐश्वर्य मांजरेकर, दिलीप मयेकर, वसंत गांवकर, आबा शिर्सेकर, पुजा खराडे, मनोज मेथर, आशिष पाटील, सौं. पाटील, निकीत वराडकर, संतोष परब यांसह नागरिक तसेच नगरपरिषद अधिकारी व सर्व कर्मचारी उत्स्फूर्तपणे स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले.
स्वच्छ मालवण सुंदर मालवण या संकल्पनेतून सातत्याने अश्या प्रकारे मालवण शहारात विशेष स्वच्छता मोहीम विविध ठिकाणी तसेच किनारपट्टी भागात आयोजित करण्यात येणार आहेत. अशी माहिती नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी दिली.
























































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.