loader
Breaking News
Breaking News
Foto

शृंगारतळी येथे 'दृष्टी आय केअर' च्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त भव्य मोफत डोळे तपासणी शिबीर संपन्न

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या शृंगारतळी येथील 'दृष्टी आय केअर अँड ऑप्टिकल'च्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मोफत डोळे तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरामुळे तालुक्यातील अनेक गरजू रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून घेण्याची संधी मिळाली. हे शिबीर 'दृष्टी आय केअर' आणि नॅब आय हॉस्पिटल, चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते. वर्धापन दिनाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन केल्याचे संयोजकांनी सांगितले. यावेळी तज्ज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांच्या डोळ्यांची संगणकीय पद्धतीने अचूक तपासणी करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ज्या रुग्णांना दृष्टीदोषासाठी चष्म्याची आवश्यकता होती, त्यांना अतिशय माफक दरात चष्म्यांचे वाटप करण्यात आले. मोतीबिंदू आणि काचबिंदू निदानाबाबत रुग्णांना मोफत मार्गदर्शन व पुढील उपचारांची माहिती देण्यात आली. ​या शिबिराप्रसंगी नॅब हॉस्पिटलचे संदीप नलावडे, डॉ.जोशी, दृष्टी ऑप्टिकलचे मालक रोहित चौगुले, अक्षय चौगुले सार्थक चव्हाण व प्रतीक पालकर उपस्थित होते. ​तसेच, सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांनीही या उपक्रमाला भेट दिली. यामध्ये 'गुहागर टाइम्स'चे संपादक निसार हमीद खान सरगुरोह, दिनेश चव्हाण,भाई तावडे, जाहीद मुजावर आणि पाटपन्हाळे ग्रामपंचायत सदस्य रियाज ठाकूर यांचा समावेश होता. मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करत अक्षय चौगुले व रोहित चौगुले त्यांच्या टीमला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg