loader
Breaking News
Breaking News
Foto

कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्याकडून लांजा तालुक्यातील १६ शाळांना सोलर पॅनेल वाटप

लांजा (संजय साळवी) - कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या स्थानिक विकास कार्यक्रम २०२५ - २६ अंतर्गत लांजा तालुक्यातील १६ माध्यमिक शाळांना 'सोलर पॅनेल' चे नुकतेच वाटप करण्यात आले. दुर्गम भागातील शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शैक्षणिक गुणवत्तेला चालना देण्यासाठी कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या स्थानिक विकास निधीतून माध्यमिक शाळांना सोलर पॅनेल वाटप करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यामध्ये न्यू इंग्लिश स्कूल लांजा, रुक्मिणी भास्कर विद्यालय व्हेळ, नवलाईदेवी विद्यामंदिर खानवली, बॅ. नाथ पै विद्यालय हर्चे, रा. सी. बेर्डे विद्यालय सापुचेतळे, आदर्श विद्यामंदिर प्रभानवली, आदिष्टी विद्यामंदिर गोविळ, श्रीराम विद्यालय वेरवली बुद्रुक, जगन्नाथ गंगाराम पेडणेकर विद्यालय तळवडे, आदर्श विद्यामंदिर देवधे, न्यू इंग्लिश स्कूल पुनस, प्रतापराव माने विद्यालय भांबेड, सरस्वती विद्यानिकेतन खावडी, कै. रा. सी. बेर्डे विद्यालय साटवली, अल - अमीन उर्दू हायस्कूल लांजा यांचा समावेश आहे. दरम्यान, यावेळी भाजपचे लांजा दक्षिण मंडळ अध्यक्ष व पंचायत समिती सदस्य शैलेश खामकर व उत्तर मंडळ अध्यक्ष विराज हरमले उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg