loader
Breaking News
Breaking News
Foto

श्रीवर्धन मतदारसंघाचा विकास खासदार सुनील तटकरे यांनी केला - अभिषेक विचारे

म्हसळा (वार्ताहर) - श्रीवर्धन मतदार संघात प्रत्येक गावागावात, वाडी वस्त्यांमध्ये जो विकास झाला आहे तो खासदार सुनील तटकरे, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, मा आमदार अनिकेत तटकरे यांचा माध्यमातून झाला आहे. अजून मोठ्या प्रमाणात कामे होणार असून मतदार संघाचा विकास राष्ट्रवादी काँग्रेस करू शकतो, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य अभिषेक विचारे यांनी कोळे हनुमानवाडी येथे अंतर्गत रस्त्याचे उदघाटन प्रसंगी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी पंचायत समिती सभापती बबन मनवे, उपसभापती लहू म्हात्रे, तालुका अध्यक्ष समीर बनकर, मुंबई अध्यक्ष महेश शिर्के, माजी सभापती मधू गायकर, किरण पालांडे, गाव अध्यक्ष अनिल चाळके, सुनील चाळके, प्रकाश मोरे, संजय मोरे, राकेश चाळके, प्रशांत चाळके आनी ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कोळे ग्रामस्थांनी आमच्यावर जो विश्वास टाकला आहे त्याला आम्ही तडा जाऊ न देता आगामी काळात कोळे गावच्या विकासाची जबाबदारी आमची राहील, असा विश्वास पुढे बोलताना अभिषेक विचारे यांनी दिला.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg