रत्नागिरी - पोदार इंटरनॅशनल स्कूल, रत्नागिरी चे दोन विद्यार्थी कुमार श्रीयश साईप्रसाद विलणकर व कुमारी पूर्वा बजरंग चव्हाण यांचे वर्ष 2026 साठी अनुक्रमे SPI छत्रपती संभाजीनगर आणि G SPI नाशिक ह्या सैन्य दलातील अधिकारी बनण्याच्या प्राथमिक तयारी साठी मेरिट पद्धतीने निवड झाली आहे. महाराष्ट्र शासनाने १९७७ मध्ये स्थापन केलेली ही एक अग्रगण्य संस्था असून ती छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे स्थित आहे. ही संस्था तरुण मुलांना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) आणि भारतीय नौदल अकादमी (INA) मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी प्रशिक्षित करते. SPI प्रशिक्षणाचे मुख्य पैलू म्हणजे ही संस्था केवळ अभ्यासावरच नाही, तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित करते.
(SPI) या संस्थेची स्थापना महाराष्ट्रतील युवकांना सैन्यदलात अधिकारी बनवण्याकरता शारिरीक, मानसिक व शैक्षणिकदृष्ट्या तयार करणे या साठी झाली. हि संस्थेत फक्त महाराष्ट्रात जन्म झाला आहे त्याच मुलांना प्रवेश दिला जातो. या संस्थेत प्रवेश मिळवण्यासाठी लेखी परिक्षा असते. लेखी परिक्षेत पास झालेल्या मुलांचा इंटरव्ह्यू होतो व त्यात सिलेक्ट झालेल्या मुलांना प्रवेश दिला जातो. महाराष्ट्रातून फक्त ६० मुलांनाच निवडले जाते. या मुलांना ११ व १२ च्या अभ्यासक्रमाबरोबर NDA, NA & Military engineering च्या परिक्षेची तयारी करून घेतात. मुलींकरता पण G SPI नाशिक येथे सुरू करण्यात आले आहे. इथे पण निवड प्रक्रिया SPI Boys सारखीच आहे. SPI ने शेकडो ऑफिसर भारतीय सैन्यदलाला दिले आहेत. येत्या जुलैला SPI मधून १६ मुलगे २ मुली NDA जॉईन करणार आहेत. शाळेच्या प्राचार्या प्राजक्ती गायकवाड ह्यांनी ह्या मुलांचे अभिनंदन केले आहे आणि पुढील वाटचालीसाठी शुभाशीर्वाद दिले आहेत.




























































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.