खेड (प्रतिनिधी) - मराठा क्रांती स्वराज्य संघटना राष्ट्रीय स्तरावर आयोजित पारितोषिक वितरण सोहळा दिग्गज मराठ्यांच्या उपस्थितीत थाटात संपन्न झाला. १० मे रोजी साईधाम बिजघर येथे पार पडलेल्या या सोहळ्यात शेकडो समाज बांधव, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते, असे मराठा क्रांती स्वराज्य संघटना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले यांनी प्रतिनिधी जवळ बोलताना सांगितले.
रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख महेशराव मोरे यांनी सांगितले, शंकरराव राघोजीराव भोसले, राजेंद्र सीताराम कदम, बडोद्याचे पांडुरंग मोरे यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला तर धनंजय शशिकांत दरेकर, विजयराव कदम, अजय तिडके यांना समजरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले तसेच महाडचे मराठा रत्न पुरस्कार विजेते चंद्रकांत साळुंखे यांना गौरवण्यात आले. उद्योगरत्न पुरस्कार मराठा क्रांती स्वराज्य संघटना मुंबई प्रदेश अध्यक्ष उद्योजक व विकासक डॉ.चंद्रकांत तुळशीराम मोजाड तसेच खेड येथील प्रख्यात आपला बाजार मालक व यशस्वी उद्योजक संदीप नायकवडी यांना प्रदान करण्यात आला. सौ.दिप्ती दिलीप यादव यांना विद्या गौरव पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
आंतरराष्ट्रीय बॉक्सर प्रमोदराव शिवाजीराव भोसले यांना संघटनेतर्फे खेलरत्न पुरस्कार देण्यात आला. यावेळी गणेश पंढरीनाथ चौधरी, राकेश शिंदे, आरती बबनराव दळवी, खेड पंचायत समिती उपसभापती सुनील बाबाराम मोरे, राष्ट्रपती शौर्य पदक विजेते उत्तमराव भोसले, सुनील तुकाराम मोरे यांना समाज गौरव पुरस्कार देण्यात आला तर उत्कृष्ट खेड नगरपालिका नगराध्यक्षा सौ.माधवी राजेश बुटाला, राज्य अध्यक्ष गुरुनाथ यशवंतराव, राज्य सरचिटणीस प्रकाशराव गणपतराव चव्हाण, गुजरात राज्य अध्यक्ष राजुभाई शेवाळे, महेशराव मोरे, पंचायत समिती सदस्य महेंद्र भोसले, रमेश उर्फ बावाशेठ चव्हाण, बडोद्याचे उद्योजक दीपक जाधव, राष्ट्रीय सरचिटणीस बडोद्याचे उद्योजक प्रदीपभाई मोरे, अजित आत्माराम कदम यांना मानाचा राष्ट्रीय समाज भुषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
























































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.