loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडीत आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा; कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांतून बाळाला जीवदान

सावंतवाडी - जिल्ह्यातील डळमळीत आरोग्य यंत्रणेचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात जन्मलेल्या एका नवजात बालकाला वेळेवर उपचार न मिळाल्याने त्याचा जीव टांगणीला लागला होता. मात्र, 'सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान'च्या कार्यकर्त्यांनी धावपळ करून दाखवलेल्या तत्परतेमुळे या बाळाला अखेर जीवदान मिळाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात काल सकाळी बरागडे दांपत्याला पुत्ररत्न प्राप्त झाले. सिझेरियन शस्त्रक्रियेमुळे मातेची प्रकृती खालावली असतानाच, नवजात बाळालाही श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. बाळाला तातडीने व्हेंटिलेटरची गरज होती. मात्र शासकीय रुग्णालयात ही सुविधा उपलब्ध नसल्याने त्याला जवळच्या खाजगी रुग्णालयात काचेच्या पेटीत ठेवण्यात आले. संध्याकाळपर्यंत बाळाची प्रकृती अधिकच खालावली. डॉक्टरांनी त्याला तातडीने गोवा-बांबोळी येथे हलवण्याचा सल्ला दिला. नातेवाईकांनी '१०८' रुग्णवाहिकेसाठी संपर्क साधला असता सर्व रुग्णवाहिका व्यस्त असल्याचे सांगण्यात आले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून नातेवाईकांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांच्याशी संपर्क साधला.

टाईम्स स्पेशल

जाधव यांनी तातडीने १०८ चे मॅनेजिंग डिरेक्टर विनायक पाटील यांच्याशी बोलून रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. मात्र, त्याच वेळी 'गोवा बांबोळी' येथे बेड शिल्लक नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली, ज्यामुळे नातेवाईक हतबल झाले. बाळाचा जीव वाचवण्यासाठी रवी जाधव, लक्ष्मण कदम यांनी डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे, डॉ. सावंत आणि डॉ. खानोलकर यांच्याशी चर्चा केली. खाजगी रुग्णालयातील सिस्टर स्वप्नाली दळवी यांना सोबत घेऊन बाळाला तातडीने पडवे येथील नारायण राणेंच्या एसएसपीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तात्काळ व्हेंटिलेटर उपलब्ध करून उपचार सुरू केल्याने बाळाची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे. एका बाजूला सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने बाळाचा जीव वाचला असला, तरी जिल्ह्यातील अपुऱ्या शासकीय आरोग्य सोयीसुविधांबाबत नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg